Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

इतकी मी गरजू नाही Gazalkara Shraddha Khanvilkar

 • गझल प्रभात • (भाग ४२ )

इतकी मी गरजू नाही
Gazalkara Shraddha Khanvilkar 

🟣 नवरात्र विशेष 🟣

🔵आजचा गझल रंग- जांभळा 🔵


🌹इतकी मी गरजू नाही🌹


हलक्या दर्जाची आलेली कुठलीही वस्तू नाही

तडजोडीवर खपेल सगळे इतकी मी गरजू नाही


असो असुदे झुकते एका बाजूला हे माप तुझ्या 

अजून दुनिये पुढे ठेवली माझी मी बाजू नाही


वास्तवातल्या दाहकतेची पुरेपूर जाणीव मला 

कल्पनेत रमणारी माझी वृत्ती स्वप्नाळू नाही


कारण या कोरडेपणाचे काय असावे लाटांनो

अजूनही स्पर्शाने झाली ओली का वाळू नाही


अशा तीर्थक्षेत्राच्या शोधामध्ये मी फिरते आहे

जिथे कुणी साधूही नाही जिथे कुणी भोंदू नाही


श्रद्धा खानविलकर


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments