Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

गझलेचे अंतरघटक Dr R B Bharswadkar

🌼 दिवाळी विशेष 🌼


🌹 गझलेचे अंतरघटक🌹

🌼 दिवाळी विशेष 🌼    🌹 *गझलेचे अंतरघटक* 🌹
Gazalkar Dr R B Bharswadkar 

 

          गझल म्हणजे केवळ शब्दांचा तंत्रशुद्ध सांगाडा नसतो. गजलेमध्ये गजलियत असणे तेवढेच महत्त्वाचे आहे. गजलियत म्हणजे गझलपण किंवा गझलतत्त्व .जसे, कवितेमध्ये कवित्व असते , कथेमध्ये कथात्मकता असते तसे, गझले मध्ये गजलत्व असते .हे गजलत्व ज्या पाच घटकांनी बनलेले आहे ,त्या विषयी थोडक्यात सोदाहरण माहिती पाहूया. या माहितीचा उपयोग ,नवीन गझल लिहिणाऱ्यांना निश्चितपणे उपयुक्त होईल अशी अपेक्षा करतो.


१.अंदाज-ए-बयां:

गझलकाराची गझल सांगायची किंवा अभिव्यक्त करण्याची खुबी. म्हणजेच त्याची स्वतःची अशी एक ठराविक style.विषय कोणताही असो,शैली त्याची स्वतःची असते. एखाद्याची शैली ही आत्ममग्न असू शकते किंवा एखाद्याची शैली सामाजिक भान असणारी असू शकते.


२. हुस्न-ए-खयाल:

हुस्न म्हणजे सौंदर्य आणि खयाल म्हणजे विचार. विचारांमधील सौंदर्य. 

कवी गझल लिहीत असतांना आपल्या कल्पनाविलासने सुंदर विचार मांडतो.


साय मी खातो मराठीच्या दुधाची,

मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला?

सुरेश भट


झिलमिलातें है किश्तियों में दिये।

पूल खडे सो रहें हैं पानी में।

बशीर बद्र


३. मौसिकी

गेयता हवी. संगीतमयता हवी. लय हवी. Rhythmicality हवी.

आपण गझल लिहिताना कठोर व्यंजनाचा वापर शक्यतो टाळला पाहिजे. चार व्यंजने आहेत ती *शक्यतो* टाळलेली बरी.

ट,ठ,ड, ढ ही चारही कठीण व्यंजने आहेत. 


मौसिकी गझल हिंदीमध्ये फार पुढे आली याचं श्रेय मालिका ए गझल मौसिका बेगम अख्तर यांना जातं.त्यांच्यानंतर नाव येतं ते मुबारक बेगम यांचं.


४. तसव्वूफ, मारीफत


उर्दुमध्ये त्यांच्या देवाची केलेली आळवणी.


सुफी गझल, नात, आखरी कलाम असे अनेक प्रकार आहेत.


आध्यात्मिक ज्ञानाची झालर, शरणागत भाव.


खिला दे फूल मेरे बाग में पैगंबरो जैसा

रकम हो जिसके पेशानी पे इक आयत जैसा


आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले

माझे धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले

:सुरेश भट


गझल मध्ये अध्यात्मिकतेची झालर अपेक्षित आहे. पूर्ण गझल अध्यात्मिक नसते.


५. नुदरत

नावीन्य, नावेपणा.

एखाद्या कवीचा एखादा शब्द आपल्याला नाहीत नसतो.

मला सुचलेली एखादी कल्पना किती नवीनपणे मी मांडू शकतो,म्हणजे नुदरत.

एखादी कल्पना वेगळ्या पध्दतीने अधिक प्रभावीपणे मांडणे म्हणजे नुदरत.


देवदूता तुझा पगार किती

का मला सांग नोकरी नाही

 ---सुरेश भट.


राहिला केर काढायचा, 

काळजाचे किती कोपरे

   ----सुरेश भट.



या पाच गोष्टी आपल्या गझलेत असतील तर आपली गझल सर्वश्रेष्ठ व्हायला वेळ लागणार नाही.



प्रा. डाॅ. रे. भ. भारस्वाडकर

छत्रपती संभाजीनगर


_______________________________

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

________________________________ 

Post a Comment

0 Comments