Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

गळके छप्पर शाळेचे कधी सांधले नाही Gazalkar Suresh Tayade

• गझल प्रभात • (भाग ५७ )

🌼 दिवाळी विशेष 🌼

गळके छप्पर शाळेचे कधी सांधले नाही
Gazalkar Suresh Tayade 


🌹गळके छप्पर शाळेचे कधी सांधले नाही 🌹


खुली डायरी असल्यावरही म्हणे उमगले नाही

जगणे माझे अजून तितके जगास कळले नाही


तलवारीला डोक्यावरती लटकत ठेवुन जगलो

म्यान रिकामी ठेवण्यात तर माझे चुकले नाही


किती भांडले रक्त सांडले मंदिर मस्जिद साठी

गळके छप्पर, हे शाळेचे, कधी सांधले नाही 


पाठीवरती नित्य घेऊन वेताळाचे ओझे

शोधुन थकलो उत्तरे तरी प्रश्न संपले नाही


लग्नपत्रिका तिची मिळाली हसतमुख चेहऱ्याने

जखमेवरती मीठ चोळणे बरे वाटले नाही


सुरेश नारायण तायडे

मलकापूर


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•= 

Post a Comment

0 Comments