• गझल प्रभात • (भाग ५६ )
![]() |
Gazalkar Divakar Joshi |
🌼 दिवाळी विशेष 🌼
🌹आतला गोडवा हवा होता🌹
सारखा गवगवा हवा होता
भोवताली थवा हवा होता
फार छळले मला वसंताने
जन्मभर पाडवा हवा होता
जीव वेडावतो फुलांसाठी
अंगणी ताटवा हवा होता
प्रेम केले कठीण फणसावर
आतला गोडवा हवा होता
जगविते लालसाच देहाला
जन्म हा नागवा हवा होता
गुंतलो मी पुन्हा स्वतःमध्ये
कोंडमारा नवा हवा होता
साठवावे किती प्रवाहाला
अंतरी सांडवा हवा होता
दिवाकर जोशी
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments