Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

सर करावे वृत्त, मात्रा अन् गणाला Gazalgandharv Sudhakar Kadam

 • गझल प्रभात • (भाग ६९ )

🌼 दिवाळी विशेष 🌼

सर करावे वृत्त, मात्रा अन् गणाला
गझलगंधर्व सुधाकर कदम 


🌹सर करावे वृत्त, मात्रा अन् गणाला 🌹


कोण जाणे काय होते या मनाला

ऐकण्याचे नाव ना घेई क्षणाला


आशयाला चुंबण्याची काय घाई

सर करावे वृत्त, मात्रा अन् गणाला


दूरवर दिसते तसे नसते क्षितिजही

बघ जरा तू झोपडीच्या अंगणाला


वाहते जर शांत सरिता वाहु दे ना

तीच जीवन देतसे साऱ्या वनाला


राज्य, राजे, राजवाडे संपले, अन्

हे नवे आले भिकारी शोषणाला


ना महाभारत न रामायण तरीही

जानकी अन् द्रौपदी लागे पणाला


-गझलगंधर्व सुधाकर कदम


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments