Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

नेत्र पाणावले हासता हासता Gazalkar Subhash Magar

• गझल प्रभात • (भाग ७० )

🌼 दिवाळी विशेष 🌼

नेत्र पाणावले हासता हासता
गझलकार सुभाष मगर 

🌹 नेत्र पाणावले हासता हासता 🌹


अंतरीच्या व्यथा झाकता झाकता

नेत्र पाणावले हासता हासता


रात्रभर ज्योत ती थरथरत राहिली

वादळांच्या कथा ऐकता ऐकता


गाल आरक्त नाहित उगीचच तिचे

लाजली ती किती लाजता लाजता


सागराला तरी काय भेटू अता

ती नदी बोलली आटता आटता


सर्व त्यागूनिया वाळले झाड अन

पांगली पाखरे पाहता पाहता


लेखणीने गळा कापलेला बघुन

थांबला तो सुरी लावता लावता


खाचखळग्यातली वाट माझी तरी

साचलो ना कधी वाहता वाहता


गर्व थकला किती प्राण गेल्यावरी

चार खांदेकरी शोधता शोधता


वाचली आजवर मी किती नाटके

चेहरा हा तुझा वाचता वाचता


जीभ चेकाळते का तयांची अशी

दोष माझ्यातले सांगता सांगता


वेळ गेली निघुन बोलण्याची तिला

बेत बोलायचे आखता आखता


तूच गेलास लावून चटका मला

बोलली मज चिता जाळता जाळता


  प्रा. सुभाष भिकाजी मगर


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•= 

Post a Comment

0 Comments