• गझल प्रभात • (भाग ५२ )
![]() |
Gazalkar Dilip Patil |
🌼 दिवाळी विशेष 🌼
🌹नका कर लावू श्वासावरती🌹
लिहून झाले खूप इथे मधुमासावरती
कधी लिहावे भाकर भूक नि घासावरती
रोज रकाने भरून येते प्रगतीचे पण
लिहिले नाही कुणीच अमुच्या त्रासावरती
डिजे, फटाके, लेझर किरणे म्हणजे उत्सव
विचार व्हावा चराचराच्या ऱ्हासावरती
शेतकऱ्यांचे हाल विनोदी नाटक झाले
राबराबणे आणि लटकणे फासावरती
खुशाल भांडा घबाड अन् सत्तेसाठी पण
उपाय शोधा गरिबांच्या उपवासावरती
किडिमुंग्यांचे मरणे मरते जनता येथे
अन् संशोधन चालू आहे डासावरती
भरा तिजोरी, लुटा तिजोरी, हरकत नाही
मात्र नका कर लावू अमुच्या श्वासावरती
दिलीप सीताराम पाटील
मो. ८३९०८९३९६१
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments