Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

विठोबा तुझे दान इतके मिळू दे||Gazalkara Leena Sakarkar

• गझल प्रभात • (भाग ५५ )

विठोबा तुझे दान इतके मिळू दे
Gazalkara Leena Sakarkar

🌼 दिवाळी विशेष 🌼


🌹विठोबा तुझे दान इतके मिळू दे🌹



व्यथेशीच झाला घरोबा असा की सुखाचे न मी दार ठोठावले

जरी घेतली जीवनाने परीक्षा तरी त्यास मी आपले मानले


जरी आपल्यांनी मला दूर केले स्वतःला नव्याने पुन्हा शोधले

मिळवली खरी आज ओळख स्वतःची, तरी पाय मागे कुणी ओढले


तुझ्या आठवांचा मनावर पहारा, नव्याने कुणी ना मला भावले

मनाच्या तळाला तुझा स्पर्श झाला कुणीही न त्याच्यात डोकावले


कसे सांग उपकार फेडू तुझे मी, दिला जन्म जेव्हा किती सोसले

सरी अंगणी आज पडल्या सुखाच्या तुझ्या वाचुनी सुख उणे वाटले


कुणावर नको भार या जीवनाचा हलाखीत आयुष्य मी काढले

विठोबा तुझे दान इतके मिळू दे, मला दे मरण फक्त तू चांगले


लिना साकरकर


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•= 

Post a Comment

0 Comments