Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

सावली Gazalkar Dr R B Bharswadkar

 • गझल प्रभात • (भाग ५८ )

🌼 दिवाळी विशेष 🌼

सावली
Gazalkar R B Bharswadkar 


🌹 सावली 🌹


आता विसाव्या सारखी, नाही कुठेही सावली

रात्री तुझ्यासाठी अशी, शोधात आली सावली 


तू रोज येथे चांदण्या, मी मोजताना पाहिले

या तळपत्या सुर्यात तू , झाली कशी ही सावली 


येणार होती पाखरे, फिरण्या तुझ्या या अंगणी

आता जटायू सारखा, शोधे इथे ही सावली 


रोगास आता सांगतो प्रतिकार शक्ती वाढली

आरोग्य असता चांगले, झुरते कशी ही सावली 


झाले फिरूनी रान हे, चारी दिशा धुंडाळुनी

थकुनी असा मग थांबता, फिरते कशी ही सावली 


प्रा. डाॅ. रे. भ. भारस्वाडकर

छ. संभाजीनगर

मो. 9730093331.


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments