अच्छी ग़ज़ल लिखना आसान है! -निदा फ़ाज़ली
1.संयोगवश मला अनेक उर्दू-मराठी मुशाय-यांमध्ये भाग घेता आला.अनेक नामवंत उर्दू शायरां बरोबर मराठी गजल पेश करता आली. महाराष्ट्र राज्य हिंदी अकादमी,अखिल भारतीय सर्व भाषिक मुशाय-यांचे आयोजन करते.किमान 12/14 भाषांचे कवी एकत्र येतात.ह्या मुशाय-यांसाठी,सातत्याने तीन वर्षे मराठी गजलचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी, हिंदी अकादमीने माझ्यावर सोपवली,त्यामुळे मुंबई,नागपूर व नांदेड येथे...भारतातल्या सर्वभाषिक गजलकारांना भेटता आले ,ऐकता आले.मुंबईतले बरेच उर्दू शायर मित्र झाले.त्यातले एक ज्येष्ठ व श्रेष्ठ नाव म्हणजे, निदा फ़ाज़ली.
2. निदा फ़ाज़लींची ओळख होण्याआधीच मी त्यांच्या गजला वाचल्या होत्या.माझे ते आवडत्या शायरांपैकी एक होते.निदांच्या बोलण्यात गजल संदर्भात एक वाक्य नेहमी यायचं.गजलचा प्रवास ते एका वाक्यात सांगायचे.ते वाक्य असे---
"ग़ज़ल अरब के रेगिस्तान में पैदा हुई,पर्सियाके
गलियोंमे पली,दिल्ली के दरबार में परवान चढी
(तारुण्यात आली) और तवायफों के (गणिकांच्या) कोठोपर जा बसी!
किती खरंय ना? अर्थात हा प्रवास रिवायती ग़ज़लचा आहे.पुढे तरक्की पसंद आणि सामाजिक आशयाचे वळण गजलने घेतले त्याला हे वाक्य लागू पडणारे नाही.असो.
3.निदांच्या उर्दू आत्मचरित्रात्मक कादंबरीचा,इब्राहिम अफगाण,ह्यांनी केलेला मराठी अनुवाद ग्रंथालीने प्रकाशित केला,त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मला करायचे होते.निदा उपस्थित राहणार होते.त्याची चर्चा करण्यासाठी ,निदाजींना त्यांच्या घरी भेटायचा योग आला.पुढे ती ओळख कायम राहिली.दिलखुलास व्यक्तिमत्व होते.
4.असो.प्रस्तावना जरा लांबली.झाले असे की एका संस्थेचा ठाण्याला,मुशायरा व गजल गायन असा कार्यक्रम होता.त्याला निदा प्रमुख अतिथी होते.मी निमंत्रित कवी होतो.संस्थेने माझ्यावर जबाबदारी सोपवली की निदाजींना,त्यांच्या घरून कार्यक्रमाला घेऊन यायचे व नंतर सूखरूप घरी सोडायचे.थोडक्यात escort करायचे.गाडीची व्यवस्थाही होती.मी आनंदाने तयार झालो.जाउन येउन साधारण दोन तास निदांबरोबर प्रवास आणि खूप गप्पा झाल्या,गजल हा विषय तर होताच.निदांची गजल उर्दू असली तरी सोप्या भाषेत असते.क्लिष्ट उर्दू शब्द फारच कमी.मी तसे त्यांना म्हटले.त्यावर त्यांनी सांगितले की नज्म/गजल मध्ये संप्रषणियता महत्वाची असते.उर्दू जाणणा-यालाही डिक्शनरी बघावी लागेल असे शब्द काय कामाचे? सोपं लिहायचं ह्याचा अर्थ अनुभवाचे सरलीकरण करायचे असा नाही.शेराचा आशय गहन असला तर तो सोपा करून टाकायचा असे नाही.मी त्यावर काही उदाहरण द्या असे सांगितले. त्यांनी आपले दोन शेर ऐकवले.ते असे....
"सफर में धूप तो होगी जो चल सको तो चलो
सभी हैं भीड में तुम भी निकल सको तो चलो"
"यहाँ किसी को कोई रास्ता नहीं देता
मुझे गिरा के अगर तुम सँभल सको तो चलो"
ह्यातल्या दुस-या शेरावर खूप बोलणे झाले,मानवी स्वभाव, जीवघेणी स्पर्धा, स्वार्थ...कितीतरी गोष्टींवर हा शेर मार्मिक भाष्य करतो.वरवर सोपा आहे,पण गहन होत जातो.
मला ही गजल माहिती होतीच.मी त्यांना सांगितले की ह्या गजलचा शेवटचा शेर फिलाॅसाॅफीकल आहे, तो मला फार आवडतो.ते सूचक हसले.तो शेर असा...
"यही है जिन्दगी कुछ ख्वाब,चंद उम्मीदे
"इन्हीं खिलौनो से तुम भी बहल सको तो चलो"
5. "देखो.." निदा मला म्हणाले. "बात आसान या मुश्किल की नही है| बात है अच्छी गजल और अपनी गजल की|
"अच्छी गजल लिखना आसान है!"
मी सरसावून बसलो.माझ्या गजल संबंधी कल्पनेला
हादराच बसला. "वो कैसे?" मी विचारले.पुढे जे बोलणे झाले त्याचा मतितार्थ असा.....
गजलचा आकृतीबंध आहे,एक शैली आहे.प्रयत्नांनी आणि अभ्यासाने ती आत्मसात करता येते.उत्तम दादलेवा शेर लिहिता येतात.ते गिमिक अनेक जण करत असतात.असे शेर दाद घेतातही,पण तुमच्या हृदयात खोलवर उतरत नाहीत.तुमच्या जगण्याचा हिस्सा होत नाहीत.जिसने चोट खाई है,वो गिडगिडाता कम है...आस्तेसे बोलता है,लेकिन सीधे दिल में उतर जाता है.त्याला मी अपनी गजल म्हणतो.मी म्हणालो "खरंय काॅलेजच्या जमान्यात आम्हाला जी गाणी आवडायची त्यातलं एक होतं
आँसू भरी है ये जीवन की राहें,
कोई उनसे कह दे हमें भूल जाये
आम्हाला त्याकाळी प्रेयसी तर सोडाच मैत्रीण ही नसायची.काल्पनिक प्रेयसी व काल्पनिक दुःख!आमची जिंदगी आंसूभरी वगैरे काही नव्हती.पण आमच्या कवितेतून दुःखच दुःख! त्या वयात आम्ही लिहायचो ते चांगलं होतं का माहित नाही.पण "आमचं" होतं,असे म्हणता येणं कठीण आहे.मी मुद्दामच निदाजींना छेडलं. "सर, प्रत्येक अनुभव स्वतः घेतला तरच लिहायचं, हे कसं शक्य आहे?"निदा हसले,हे बघा मी काय म्हणतोय ते तुम्हाला समजलंय.उगाच विषयांतर करू नका.तरी सांगतो.'जिंदगी आपको हर पल सिखाती है,कुछ राज खोलती है....आप समझ जाते हो,पर अंदरही अंदर उसे आप लफ्जों में,कह नही पाते.इसी को अंडरस्टँडिंग भी कह सकते हो.वो जो आप शब्दोंके बगैर जानते हो....वो आपका अपना होता है,अगर वो बात जो बयाँ नही होती...आपके शेर में आ गयी तो वह शेर दिल को छू जाता है... मुझे गिरा के तुम सम्हल सको तो चलो! असं म्हणून निदा थोडं रहस्यमय हसले. पण मला काय कळायचं ते कळून गेलं होतं.काय कळलं विचारलं तर सांगता नाही येणार. कारण जीवनाने जणू एक रहस्य क्षणभर उघडलं आणि लगेच झाकून टाकलं होतं.अच्छी गजल लिखना मुश्किल नही है...अपनी गजल लिखना मुश्किल है। अगर गजल में आपकी आयडेंटिटी नही है तो ,वो किस काम की" असं एका जमान्या पूर्वी फैज साहेबांनी सांगितलं होतं असं म्हणतात.माझ्या वाचनात नाही.पण निदाजीं बरोबरचा तो प्रवास,ती संध्याकाळ माझी गजल बद्दलची जाणीव समृध्द करून गेली.आज निदा नाहीत.पण ह्या वाक्याच्या रूपाने ते मला सतत सावध करत असतात. मीही इतरांना तेच सांगतो
"अच्छी गजल लिखना मुश्किल नहीं है...अपनी गजल लिखो!"
. सदानंद डबीर.९८१९१७८४२०
(आवडल्यास जरूर शेअर करा.अनुमती आहे.)
. ¤¤¤¤¤¤¤¤
0 Comments