Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

तुला भेटायला वारीत मी येणार आहे Gazalkar Nandkishor Thombare

• गझल प्रभात • (भाग ८१ )

🌼 दिवाळी विशेष 🌼

तुला भेटायला वारीत मी येणार आहे
गझलकार नंदकिशोर ठोंबरे 


🌹 तुला भेटायला वारीत मी येणार आहे🌹


तुझ्या या पामराची एक बघ तक्रार आहे

तुझा का पांडुरंगा रंग काळाशार आहे?


कधी अंधार आयुष्यातला मिटणार आहे?

तुझ्या दारात देवा मांडला संसार आहे


मनाला लागलेला तू असा आजार आहे

तुझ्या हातात आता काय तो उपचार आहे


कसा मिटवून डोळे शांत तू बसतोस देवा?

तमाच्या बघ तळाशी साचला अंधार आहे


किती रमतोस तू या वाळवंटी विठ्ठला रे!

म्हणूनच हा अबोला मी तुझा धरणार आहे


अपेक्षाभंग वाट्याला असे येतात माझ्या

जसे मी एक दुःखाचे जणू कोठार आहे


नको देऊस दर्शन ऑनलाइन विठ्ठला रे

तुला भेटायला वारीत मी येणार आहे


उभा तू जन्मभर ठेवुनि कटीवर आपले कर

कधी माझ्या व्यथेची सांगता होणार आहे



 नंदकिशोर ठोंबरे

 नाशिक

 मो. 9881074441


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•= 

Post a Comment

0 Comments