• गझल प्रभात • (भाग ८२ )
![]() |
गझलकार अनिल कांबळे |
🌹त्यास आहे पोर लग्नाच्या वयाची🌹
जाण नाही ठेवली त्याने कुणाची
केवढी त्याला नशा झाली यशाची
वाचले नाहीस तू ते 'खास' प्रकरण
उलटली नुसतीच पाने पुस्तकाची
लाभला विश्वास पंखांना बळाचा
पाखरांना मग तमा कोठे नभाची
सभ्य तर माणूस होता, पण बदलला
रीत झाली पाशवी का माणसाची
स्पर्शिले सीतेस नाही रावणाने
जिंकला रावण कसोटी संयमाची
मोहमायेच्या जगी तो संत झाला
त्यागली वस्त्रे असावी मी पणाची
राबतो हल्ली जरासा जास्त तो ही
त्यास आहे पोर लग्नाच्या वयाची
अनिल कांबळे
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments