• गझल प्रभात • (भाग ७१ )
🌼 दिवाळी विशेष 🌼
![]() |
| गझलकारा अर्चना देवधर |
🌹 उंबऱ्याच्या पार गेली 🌹
पावलांची धाव आता उंबऱ्याच्या पार गेली
झेप आणिक माणसांची अंबराच्या पार गेली
हातुनी घडल्या चुकांची ना कुणी पर्वाच केली
काय बुद्धी माणसांची जाणण्याच्या पार गेली?
ओसरी होती भुकेली पाखरांसाठी कधीची
ओढ मायेची कशी त्यांच्या मनाच्या पार गेली?
डोह डोळ्यांचे अताशा कोरडे झाले कशाने
अंतरीची वेदना का मांडण्याच्या पार गेली?
शेर गझलेचा तुझ्या तर चांगला बहरून आला
आशयाची उच्च श्रेणी सांगण्याच्या पार गेली
अर्चना देवधर
रत्नागिरी
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments