• गझल प्रभात • (भाग ५४ )
![]() |
Gazalkar Sanjay Kulaye |
🌼 दिवाळी विशेष 🌼
🌹एक दिवाळी 🌹
लाख दिव्यांनी झगमगणारी एक दिवाळी
अंधारातुन मिटमिटणारी एक दिवाळी
नवी कापडे पांघरणारी एक दिवाळी
जुनेर मळके सावरणारी एक दिवाळी
लाडू चकल्या हादडणारी एक दिवाळी
शिळेच तुकडे कुरतडणारी एक दिवाळी
रांगोळ्यांमधुनी दिसणारी एक दिवाळी
दुःखावर दुःखे पिसणारी एक दिवाळी
आनंदझुल्यावर झुलणारी एक दिवाळी
व्यथा वेदनांना भुलणारी एक दिवाळी
आस जिवाला दाखवणारी एक दिवाळी
कशास येते ही सलणारी एक दिवाळी?
संजय कुळये
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments