• गझल प्रभात • (भाग ६० )
🌼 दिवाळी विशेष 🌼
🌹माझ्यावरी तुझा हा उपकार होत नाही🌹
हे सत्र संकटांचे का पार होत नाही
दैवा तरी पहा मी लाचार होत नाही
अनुभव तुला हजारो आलेत माणसांचे
तरिही अलिप्त होण्या निर्धार होत नाही
देणे तसेच घेणे व्यवहार फक्त होतो
अपुल्यामधे कधी का शृंगार होत नाही ?
लिंपून कोरडीशी हळहळ उगा मनावर
वाटे जरा बरे पण उपचार होत नाही
आकाश चांदण्यांचे बघशील सांग कोठे?
सूर्या तुझ्या इथे तर अंधार होत नाही!
ही वागणूक प्रेमळ आहे गरज तुझीही
माझ्यावरी तुझा हा उपकार होत नाही
गवतास पाहिल्यावर बागेस वेल म्हणते
'नुसताच सोबती हा, आधार होत नाही'
- प्राजक्ता पटवर्धन
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments