Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

पसारा Gazalkara Snehalata Zarkar-Andure

 • गझल प्रभात • (भाग ७५ )

🌼 दिवाळी विशेष 🌼

पसारा
गझलकारा स्नेहलता झरकर-अंदुरे


🌹पसारा 🌹



देऊन चूक केली दुःखास मी निवारा 

लावून कूळ बसले मांडून ते पसारा


इच्छा तिची नभाला घालायची गवसणी

दिसल्यात उंबर्‍याला अस्वस्थ येरझारा


ग्रिष्मातल्या झळांनी मन पोळले कितीही

होतो वळीव त्याचा आकंठ भिजविणारा 


घर बांधले सुखाने कक्षेत सावलीच्या

दिसतो उन्हा तिथेही दाहक तुझा दरारा


घेऊन सूर्य येतो स्वप्ने नवी नि सुंदर

धरती कवेत घेते अलवार तो नजारा


बोलून सर्वकाही नाही तुला समजले

नजरेमधे इशारा होता खुणावणारा


रात्रंदिवस मनावर चढली नशा अशी की

गझले अता तिच्यावर आहे कुठे उतारा .. . ?



स्नेहलता झरकर - अंदुरे 

उस्मानाबाद (धाराशिव)

मो. ९३५९८४१४९०



=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments