Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

उत्कृष्ट नियोजनासाठी प्रेरणास्रोत ठरेल असा सोहळा-Vasudeo Gumatkar

उत्कृष्ट नियोजनासाठी प्रेरणास्रोत ठरेल असा सोहळा

उत्कृष्ट नियोजनासाठी प्रेरणास्रोत ठरेल असा सोहळा


   'पुणे तेथे काय उणे' या उक्तीला साजेसा ठरणारा प्रेरणादायी कार्यक्रम पाहायला मिळाला.एखादा कार्यक्रम यशस्वी करायचा असेल तर तो कशाप्रकारे नियोजित केला पाहिजे,याचे उत्तम उदाहरण म्हणजे अखिल भारतीय महिला गझल संमेलन २०२३ पुणे.

या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा कार्यकारिणीचे कौतुक करावे तितके कमीच.प्रत्येकाला मिळालेली जबाबदारी ही प्रत्येकाने जबाबदारीने पूर्ण केली.सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचे नियोजन चांगल्याप्रकारे केलेले होते.

       गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिलजी कांबळे यांनी कार्यक्रमाची आखणी केल्यानंतर आम्हा सर्वांना जी जबाबदारी मिळेल ती पूर्णत्वास करण्याचा प्रयत्न केला.वैशालीताई माळी यांच्या बहारदार सुत्रसंचलनामुळे कार्यक्रमाला जीवंत रुप मिळाले . प्रदीप तळेकर सर,मंदार खरे सर,  कार्यक्रमात नेमके कुठे काय हवे, बारकाईने लक्ष देत होते.बा.ह.मगदुम सरांनी कार्यक्रमाची पूर्वतयारी चोखपणे बजावलेली होती.अॅड मुकुंदराव जाधव यांनी कार्यक्रमासाठीची उत्कृष्ट पत्रिका आणि सुंदर बॅचेस डिझाईन करून आणले.डॉ रेखा देशमुख पाहुण्याशी संवाद साधणे, बॅचेस लावणे या गोष्टी जबाबदारीने करत होत्या.रेखा कुलकर्णी व सरीता कलढोणे पाहुण्यांचे स्वागत, ट्रॉफी, प्रमाणपत्र लिहणे -वाटप करणे या गोष्टी चांगल्याप्रकारे करत होत्या.विजयाताई नवले सारखे बरेच सदस्य आपल्या हाती जे जे काम येईल ते ते करून कार्यक्रमाची शोभा वाढवण्यास मदत करत होते.प्रसिद्धी प्रमुख भरत माळी यांनी जाहिरातीद्वारे संमेलन महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर पोहोचवले.प्रशांत डिजिटल यांनी कार्यक्रम पत्रिका, दिवाळी अंक, गझलयात्री -3 योग्य वेळी गझलरसिकांच्या हाती उपलब्ध करून दिला.

      देवकामाई देशमुख यांनी संस्थेच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रम स्थळी उपस्थित राहिल्या आणि संस्थेचा मानाचा पुरस्कार स्विकृत केला.शोभाताई तेलंग इंदोरवरून दिलेल्या वेळेत उपस्थित राहिल्या.संमेलनाचे अध्यक्षस्थान स्विकारून सर्वांना आपल्या वाणीने मंत्रमुग्ध केले.त्याचबरोबर संगितामाई जोशी,म .भा.चव्हाण, डॉ . संदीप गुप्ते यांनी वेळेत उपस्थित राहून संस्थेचं आदरातिथ्य स्विकारलं.संस्थेच्या मार्गदर्शिका उर्मिलामाई बांदिवडेकर, डॉ. स्नेहलताई कुलकर्णी यांच्या गझलांनी कार्यक्रमास उच्च स्तरावर नेले.मुशायऱ्याच्या कार्यक्रमाला लाभलेल्या सर्व अध्यक्षा यांनी वेळेत उपस्थित राहून बहारदार गझलांनी कार्यक्रम उत्तुंग स्तरावर पोहोचवला.मुशायऱ्याच्या सुत्रसंचालकांना दिलेल्या सुचनांचे त्यांनी काटेकोर पालन केले आणि दिलेल्या वेळेच्या आत मुशायरा संपन्न केला.

      संमेलनासाठी बाहेर जिल्ह्यातील सहभागी गझलकारा दिलेल्या वेळेत कोणतेही कारणे न देता उपस्थित राहिल्या आणि आपल्या बहारदार गझलांनी,शेरांनी सभागृहात चांगल्या वातावरणाची निर्मिती केली.

      संमेलन यशस्वी होण्यासाठी जयवंत वानखेडे सरांसोबत, अनिलजी ढगे, संजयजी कुळये यांच्यासारखी मंडळी मेहनत घेत होती. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुणे जिल्हा कार्यकारिणी सदस्यांनी खूप खूप मेहनत घेतली आहे.कार्यक्रमाच्या नियोजनासाठी प्रमोददादा खराडे, व्यवस्थापकीय संपादक निलेशजी कवडे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत होते.याच मेहनतीचे फळ म्हणून एक दर्जेदार आणि यशस्वी कार्यक्रम संपन्न झाला.त्याचबरोबर गझलरसिकांच्या उपस्थितीमुळे संमेलनाला आणखी शोभा वाढली. या कार्यक्रमामुळे गझल मंथन परीवारासोबत जोडलेले सदस्य प्रत्यक्ष समोरासमोर भेटले आणि परीवार सदस्य भेटल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला.


वसुदेव गुमटकर 

सुभानपूर,मेहकर 

Post a Comment

0 Comments