राजापूर - ओणीत मराठी गझल लेखन कार्यशाळा संपन्न.. उत्कृष्ट प्रतिसाद..आत्मिक समाधान देणारा दिवस..!!
![]() |
मार्गदर्शन करताना गझलकारा डॉ स्नेहल कुलकर्णी |
गझलमंथन साहित्य संस्थेचा चढता... ऊर्जादायी गझलालेख...!!!
रविवार दि.१० डिसेंबर रोजी गझल मंथन साहित्य संस्था व रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीतर्फे राजापूर तालुक्यातील नूतन विद्यामंदिर ओणी येथे निःशुल्क गझल लेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.ओणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, प्राचार्य वासुदेव तुळसणकर यांचे या कार्यशाळेसाठी प्रचंड सहकार्य लाभले.
संपूर्ण कार्यक्रमाचे गझलकार आशिष सावंत यांनी केलेले खुमासदार अन् तितकेच अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन... प्रत्येकाला खिळवून ठेवणारे...!!!
नूतन विद्या मंदिर ओणीच्या निसर्गसौंदर्याने नटलेल्या आवारात, गुरुवर्य शहाजी खानविलकर या सुसज्ज दालनात भरलेल्या या कार्यशाळेत मी व डॉ. राज रणधीर यांनी जवळजवळ चाळीस प्रशिक्षणार्थीना.. गझलविषयक मार्गदर्शन केले.त्यातून एक वेगळेच समाधान, एक वेगळीच आनंददायी आत्मानूभुती प्रत्ययास आली. गझलविधेवर परिपूर्ण मार्गदर्शन करताना प्रशिक्षणार्थीनीही तेवढ्याच समरसतेने अनेक शंका विचारून कार्यशाळा प्रचंड यशस्वी करून दाखवली... हॆ जास्त सुखावणारं होतं.
त्यानंतर डॉ.राज रणधीर आणि आ.अजीज मुकरी यांच्या अध्यक्षतेखाली दोन बहारदार मुशायरे संपन्न झाले.मकसूद सय्यद आणि अर्चनाताई देवधर यांनी बहारदार, लाजबाब सूत्रसंचालन करून मुशायरे आणखीच रंगतदार केले.कोकण भागातील आद्य गझलकार आ. देविदास पाटील यांच्याबरोबर सुनेत्रा जोशी, शुभम कदम, गुरुराज गर्दे, समीर देशपांडे, राजू सुर्वे, माधुरी खांडेकर, संजय कुळये, विद्यानंद जोशी, मुग्धा कुळये, केदार पाटणकर,संजय तांबे, अशरफ मुकरी,आशिष सावंत, सरिता गोखले.. या सर्वांनीच अनेक उत्तमोत्तम गझला सादर केल्या. नावीन्यपूर्ण शेर आणि त्याला रसिकांचा भरभरून मिळणारा प्रतिसाद... हॆ चित्र माझ्यातील गझलकारा.. प्रवृत्ती संतृप्त करणारं होतं...कान तृप्त करणारं होतं !!
कोकणातील ओणीसारख्या छोटया गावात अशा प्रकारची गझल कार्यशाळा ओयीजत करणं आणि ती इतक्या मोठया प्रमाणात यशस्वी करून दाखवणं... हॆ गझल मंथन साहित्य संस्था आणि रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची अत्यन्त अभिमानास्पद आणि कौतुकास्पद कामगिरी आहे... गझल विश्वातील एक व्यापक, प्रचंड आशादायी पाऊल आहे.समस्त गझलकारांना सुखावणारे चित्र आहे.
गझलविधेचा हा ऊर्जादायी सन्मान घडवून आणणारे....
कोकण विभाग प्रमुख संजयदा कुळये आणि रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीच्या सौ. मुग्धा कुळये... साहित्याला, गझलेला वाहून घेतलेले हॆ दांपत्य...त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे. त्यांची शांतताप्रिय गझलनिष्ठा प्रत्येक गझलकारासाठी अनुकरणीय,... आहे.गझलकारांना, गझलप्रेमीना आपल्या घरचा लाघवी पाहुणचार करायला लावून कृतकृत्य होणारी.. त्यांची माया.. तिचं मोल कशात करावं...!!!
त्याचबरोबर कोकण विभाग सहसचिव जोशी,रत्नागिरी कार्यकारिणीचे पूर्णिमा पवार,विजयानंद जोशी,अर्चना देवधर,आशिष सावंत, माधुरीताई खांडेकर,मकसूद सय्यद, सौ. सरिता गोखले...या सर्वांचेच या कार्यक्रमातील योगदान वाखाणण्याजोगे आहे.
अनेक गझलकारांच्या,आपुल्यांच्या झालेल्या भेटीगाठी.. ही आणखी एक जमेची बाजू.....!!!
गझलविधेने दिलेलं हॆ आनंदाचे वाण........!!!
तिची कशी उतराई होऊ...???
या सर्वासाठी गझलमंथन साहित्य संस्थेचे सर्वेसर्वा अध्यक्ष अनिलदा कांबळे,जयवंतदादा वानखेडे, उमा पाटील, देवकुमारजी ( वसुदेव गुमटकर )..... यांची स्नेहांकित..!!!
... डॉ. स्नेहल कुलकर्णी
0 Comments