Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

नाही ग्वाही Gazalkar Shivaji Salunke

• गझल प्रभात • (भाग ९३ )

नाही ग्वाही
गझलकार शिवाजी साळुंके 

नाही ग्वाही


मनात माझ्या असेच येते काही बाही

जीव गुदमरतो आणि होते लाही लाही


कधी कधी तर अवचित घडते असे अचानक 

 मन हे माझे दिशात फिरते दाही दाही


कुणापुढे मी मन हे उघडे सांग करावे?

मन हे माझे मलाच म्हणते नाही नाही


जोवर मन हे तुझ्यात होते सखे गुंतुनी

जीवन जगलो सम्राटाचे शाही शाही


धरणीनेही किती सहाव्या कळा अवकळा

निसर्गराजा तिला छळतसे त्राही त्राही


कशास बघते सतत आरसा 'किरण' सांगना?

क्षणात होतिल फुटून तुकडे नाही ग्वाही


शिवाजी साळुंके, 'किरण'

चाळीसगाव


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•= 

Post a Comment

0 Comments