*• गझल प्रभात •* (भाग ९२ )
![]() |
गझलकारा छाया बैसाणे -सोनवणे |
नको घाव घालू पुन्हा काळजावर,
कुठे राहिला भरवसा माणसांवर
जरी राबतो बाप शेतात कायम,
नजर मात्र त्याची असे पावसावर
दिसावी कळावी व्यथा शोषितांची,
लिहावे जरासे मुक्या यातनांवर
हसावी, सजावी वधू मंडपी त्या,
लिहू काय अजुनी तिच्या भावनांवर
असो लांब पल्ला नदीचा कितीही,
निखळ प्रेम असते तिचे सागरावर
म्हणाला मला सर्व विसरून जा तू,
कसे मी जगावे तुझ्या आठवांवर?
नको या मनाला अशी ओढ लावू,
जरा ठेव ताबा तुझ्या भावनांवर
छाया बैसाणे-सोनवणे
मेहुनबारे, जळगांव
मो. 9284635108
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments