Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

जमले नाही Gazalkar Ganesh Bhute

 • गझल प्रभात •    (भाग ८३ )

जमले नाही
गझलकार गणेश भुते


🌹जमले नाही 🌹



निवांत आईबाबांसाठी वेळ काढणे जमले नाही

मला यशामागे पळताना जरा थांबणे जमले नाही


आयुष्याच्या वाटेवरती इतकी होती सुखे मिळाली

आयुष्याचा मोह त्यामुळे सहज टाळणे जमले नाही


कठोरता अन् संतापाने सतत वागणे चालू होते

पण एका मर्यादेनंतर धाक ठेवणे जमले नाही


प्रगत स्वतःला म्हटले आपण, समानतेवर चर्चा केल्या

तरी विषमता मनातून का पूर्ण जाळणे जमले नाही


फुलात वसणाऱ्या गंधासम माझ्यात तुझा वावर होता

माझ्या कवितेतून कधीही तुला वगळणे जमले नाही


गणेश भुते


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments