• गझल प्रभात •(भाग ९८ )
गझलकार अनिल कांबळे |
🌹आता नको🌹
आतल्या आत एल्गार आता नको
चल अगोदर लढू, हार आता नको
सांग मित्रा मला काय चुकतो तिथे
फक्त खोटाच सत्कार आता नको
वांछिले तेच सारे मिळाले कुठे
वागणे मात्र लाचार आता नको
न्याय मिळतो जिथे फक्त तेथेच चल
व्यर्थचा तोच दरबार आता नको
लोकनायक जगी शोभणारा हवा
खेळण्यातील सरदार आता नको
अनिल कांबळे
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments