Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

झोक्याबरोबर जायला हलके बनावे लागते Gazalkara Dr Snehal Kulkarni

• गझल प्रभात • (भाग ९९ )
झोक्याबरोबर जायला हलके बनावे लागते
गझलकारा डॉ स्नेहल कुलकर्णी 


झोक्याबरोबर जायला हलके बनावे लागते 



मातीत पायांचे वजन लोटून द्यावे लागते 
झोक्याबरोबर जायला हलके बनावे लागते

आस्तित्व गाभाऱ्यात अंधुक चाचपावे लागते
भेटून क्षणभर जायला लांबून यावे लागते

आई तुझी शिकवण नकोसा जन्म उजळुन टाकते
परतून जाताना तुला.. येते म्हणावे लागते

कोण्या बुवाच्या पालखीसाठी कसा थांबेल तो
त्याला जनाईच्या घरी पाणी भरावे लागते

डोळ्यांतल्या आशेसकट उतरव तुझा जामानिमा 
गोटात माझ्या यायला.. साध्वी ठरावे लागते

कळणारही नाही उन्हामागुन कधी गेले धुके 
कवटाळण्यासाठी हृदय तत्पर असावे लागते 

समजून वाटा त्या खऱ्या.. डोहात कोसळलीस तू 
प्रतिबिंब सृष्टीचे 'दिशा' उलटे बघावे लागते

.. दिशा
डॉ. स्नेहल कुलकर्णी

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments