Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

चैतन्यगान Gazalkar Ashok Wadkar

• गझल प्रभात • (भाग ९४ )

चैतन्यगान
गझलकार अशोक वाडकर 


चैतन्यगान 


युगायुगांची अंधाराची काळरात्र लोपली

नवदीप्तीची चैतन्याची प्रभा पहा फाकली


जुन्या रुढींचे दास्य संपले नवे वेद जीवनी

क्षितिजावरती सोनकेशरी छान छटा दाटली


घरट्याघरट्यामधुन तेवती ज्ञानरूपी वाती

काळोखाच्या गुहा उजळती स्नेहज्योत लावली


अम्हीच अमुच्या भवितव्याची स्वप्ने जोजवीली

दैवावरती कशा हवाला?...बात नवी छेडली


समानतेचा सुटला वारा बंधुभाव मानसी

एकदिलाची एकोप्याची दीठ नवी लाभली


अशोक म. वाडकर


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•= 

Post a Comment

0 Comments