• गझल प्रभात • (भाग ९५ )
![]() |
गझलकारा अंजली दीक्षित |
🌹काटा 🌹
खूप वेळा जो मनाला बोचला
तोच काटा नेमका सांभाळला
क्षण वियोगाचा किती होईल जड
आठवांनी जर पसारा मांडला
सत्य उत्तर पाहिजे होतेच का?
गप्प करण्या प्रश्न होता फेकला
चेहऱ्यावर चेहरा लावून घे
पारदर्शक चेहरा जर वाटला
पाहिले झटकून मी माझेच मन
फक्त आणिक फक्त कचरा सांडला
अंजली दीक्षित (पंडित)
छ. संभाजीनगर
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments