• गझल प्रभात • (भाग ९० )
![]() |
गझलकार अतुल देशपांडे |
🌹समजून ती घेते 🌹
तुझ्याशी नेहमी जुळवून ती घेते
चुकांवर पांघरुण घालून ती घेते
कधी मुलगी कधी पत्नी कधी आई
हव्या त्या भूमिका वठवून ती घेते
तिच्या इच्छा अपेक्षांना कुठे किंमत
अपेक्षांना तिच्या मढवून ती घेते
समजदारी तुझ्या रक्तात नाही पण
तुला आयुष्यभर समजून ती घेते
चुका मुद्दाम केल्या का तिने सांगा
तरीही बोलणे ऐकून ती घेते
दिला नाही तिला आधार केव्हाही
घराचा भार सांभाळून ती घेते
तिचे अस्तित्व उरते वेगळे कोठे
स्वतःला एवढे बदलून ती घेते
अतुल देशपांडे
नाशिक
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments