• गझल प्रभात • (भाग १०६ )
![]() |
गझलकार अविनाश कासांडे |
🌹अनामिका 🌹
दु:ख आजही कसे पाळते अनामिका,
काळजास का असे जाळते अनामिका ?
मोगरा तिच्यावरी अजुन जीव वारितो,
गंध नेमकाच तो टाळते अनामिका
कुंतलात गुंतण्या पुष्पराज सज्ज तो,
शूल नेमके परी माळते अनामिका
दु:ख देखणे जरी पोसते उरात ती,
आसवांसवे तया ढाळते अनामिका
टाळुनी सुखासही साधतेच काय ती ?
प्रश्न का व्यथेवरी भाळते अनामिका ?
अविनाश कासांडे
सुपेकर, गंगाखेड
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments