• गझल प्रभात • (भाग १०७ )
![]() |
गझलकार दिगंबर खडसे |
🌹जुना आहे डिसेंबर मी🌹
जगाशी वागताना हा गुन्हा केला खरोखर मी
चुकीला चूक म्हटले अन् बरोबरला बरोबर मी
जरासे वेगळे काही कराया पाहिले जेव्हा
कळेना ओढल्या गेलो कसा मागे भराभर मी
कधी सृष्टीतला इवला अणू होऊन वसतो अन्
कधी व्यापूनही उरतो इथे अवघे चराचर मी
जुने बाजूस ग्रह करुनी कधी तू भेट ना सखये
तुला सांगेन माझ्याही मनामधले सविस्तर मी
भले दुर्लक्षुनी किंवा भलेही टाळुनी मारा
तरी स्पर्धेमधे तुमच्या उभा आहे कलंदर मी
मला शोधू नको आता नव्या कँलेंडरामध्ये
तुझ्या केवळ स्मृतींमधला जुना आहे डिसेंबर मी
दिगंबर खडसे
अकोट जि. अकोला
मो. 9623739378
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments