Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

आकाशाच्या उंचीला मी घाबरलो नाही Gazalkar Jaywant Wankhade

• गझल प्रभात •(भाग ८४ )

आकाशाच्या उंचीला मी घाबरलो नाही
गझलकार जयवंत वानखडे


🌹आकाशाच्या उंचीला मी घाबरलो नाही🌹


इवले असुनी पंख कधीही सरपटलो नाही

आकाशाच्या उंचीला मी घाबरलो नाही


जन्मतःच मी मारत गेलो इच्छांना अपुल्या

ओझ्याखाली इच्छांच्या मी गुदमरलो नाही


दिली आमिषे खूप आतल्या चकव्याने मजला

सरळ चाललो मी नेमाने भरकटलो नाही


कानावरती कधी भरवसा मी केला नाही

म्हणून चुगली करणाऱ्यांना आवडलो नाही


शाल व्यथेची पांघरूणही आनंदी दिसतो

याचमुळे सौख्याला अजुनी सापडलो नाही


जयवंत वानखडे

कोरपना जि. चंद्रपूर 

मो. ९८२३६४५६५५, १२०५२०२३


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•= 

Post a Comment

0 Comments