Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

हवी संधी दुरावा सांधण्यासाठी Gazalkar Jaywant Wankhade

 • गझल प्रभात •   (भाग १०२ )


हवी संधी दुरावा सांधण्यासाठी
गझलकार जयवंत वानखडे 


हवी संधी दुरावा सांधण्यासाठी


हवी संधी दुरावा सांधण्यासाठी

तिला भेटायचे आहे अशासाठी


तुला लपवू सुखा कोठे कळत नाही

व्यथा आली अचानक भेटण्यासाठी


नको थांबूस चढ पाहून वाटेवर 

तयारी कर मनाची धावण्यासाठी


जराशी वाटते चिंता भविष्याची

तसा आहे सुखी मी सांगण्यासाठी


किती तंबूत नाचावे कुणी सांगा

इथे कीर्ती अबाधित ठेवण्यासाठी


जयवंत वानखडे

कोरपना जि. चंद्रपूर

मो. ९८२३६४५६५५


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments