• गझल प्रभात • (भाग १०३ )
![]() |
गझलकार सदानंद डबीर |
🌹षंढसे! 🌹
तो मुका, सरकार बहिरे, दिवस आलेले असे
दुःख दरबारात त्याने न्यायचे आता कसे?
तो लुटारू, तोच पोलिस, न्याय देवी आंधळी
कायद्याचे राज्य आहे चाललेले छानसे
दहशतीने गप्प केले सर्व साक्षीदारही
दफ्न केलेल्या गुन्ह्याचे प्रेतही आता नसे
तोच आहे कायदा अन् तीच कलमे कालची
कायदेपंडित बदलता अर्थ काढावे तसे!
रक्त ना पेटत कुणाचे, नाच नंगा पाहुनी
आपल्या जगण्यात मश्गुल सर्व आम्ही षंढसे!
सदानंद डबीर
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments