• गझल प्रभात • (भाग १०१ )
गझलकार विजय वडवेराव |
🌹खास बागेत जाता🌹
कसा घात केलास डावात एका
मला हारलो मी जुगारात एका
कडेलोट माझा तसा शक्य नव्हता
तुला साधला तो नकारात एका
तुझ्या आठवांची हजारो स्मशाने
कुठे जीव जळतो स्मशानात एका
तुला टाळण्या खास बागेत जाता
तुला पाहिले मी गुलाबात एका
निळा, पांढरा, गर्द हिरवा कि भगवा
उभा जन्म साला तणावात एका
भिती वाटते हीच आरक्षणाला
कसा देश बांधू विचारात एका
निळाईकडे बोट दावून गेला
पिढ्या गगन झाल्या इशाऱ्यात एका
विजय वडवेराव
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments