Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

माणुसकीची झाली येथे पडझड आहे Gazalkar Mukundrao Jadhav

• गझल प्रभात • (भाग ११० )

माणुसकीची झाली येथे पडझड आहे



जगण्यासाठी प्रत्येकाची धडपड आहे
मरतांनाही मोह सोडणे अवघड आहे

ठेवली असे संसाराची ज्योत तेवती
वादळवारा येता होते तडफड आहे

दु:ख दाबुनी लिहिली होती गझल मनाची
गझलियत जणू या हृदयाची धडधड आहे

घ्यावा आता जन्म एकदा सावित्रीने
स्त्री जन्माची आजही किती परवड आहे

निवडुनी दिला नेता होता सेवेसाठी
जनसेवेच्या नावाखाली गडबड आहे

मला मिळाली बायको गुणी रूपसुंदरी
कळले नंतर सदैव छळते बडबड आहे

जो-तो येथे स्वार्थासाठी धावत आहे
माणुसकीची झाली येथे पडझड आहे

ॲड. मुकुंदराव भाऊराव जाधव
जळगाव 

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments