• गझल प्रभात • (भाग १०४ )
![]() |
गझलकारा दिपाली वझे |
🌹 साडी 🌹
सणासुदीला नेसत जावी साडी
प्रसंगातही मिरवत जावी साडी..
नवदुर्गेची अगाध महिमा गावी
चरणावरती ठेवत जावी साडी..
आई बहिणी अन् पत्नीला द्यावी
गंगेलाही वाहत जावी साडी..
वाऱ्याने जर भिरभिर उडली साडी
पापण्यांसवे झाकत जावी साडी..
सभ्यपणाशी जोडत जावी साडी
सरणावरती सोबत जावी साडी..
सौ. दिपाली महेश वझे
बेंगळुरू
मो. 9714393969
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments