• गझल प्रभात •(भाग ९६ )
![]() |
गझलकार विजय माळी |
🌹कैफात नाव वेड्या🌹
कैफात नाव वेड्या फसते कधी कधी बघ
बेताल जिंदगी मग हसते कधी कधी बघ
झोकून दे स्वतःला सांभाळण्यास नाते
रक्तातले कुणाच्या नसते कधी कधी बघ
धावू नकोस येथे आयुष्य भास आहे
आयुष्य माणसाला कसते कधी कधी बघ
दारास उंबराही माझ्या परीस साधा
शांती समेत लक्ष्मी वसते कधी कधी बघ
दाबून ठेवतांना दुःखास काळजातच
रात्रीस दु:ख वेडे डसते कधी कधी बघ
विजय जगन्नाथ माळी
सांजोरी ता. जि. धुळे
ह. मु. अंबरनाथ
मो. ९२०९२५३९७८
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments