• गझल प्रभात • (भाग ९७ )
🌹आयुष्या🌹
अहिंसेला दिला आहेस तू होकार आयुष्या
कशाला पाहिजे दुसरे..पुन्हा हत्यार आयुष्या
अपेक्षा फार केली तर.. तुझी फाटायची झोळी
मिळाले तेवढे कायम हसत स्वीकार आयुष्या
चहूबाजूस शत्रू, युद्धही घनघोर आहे हे
दिला ना हारण्याचा मी, मला अधिकार आयुष्या
चुका केल्या, गुन्हा नाही.. नको आरोप माझ्यावर
मला ऐकायची नाही तुझी तक्रार आयुष्या
कितीदा भंगल्या इच्छा, कितीदा मोडली स्वप्ने
स्वत:चाही सतत केलास जीर्णोद्धार आयुष्या
साै. दिपाली कुलकर्णी
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments