• गझल प्रभात • (भाग ८६ )
![]() |
गझलकार यशवंत मस्के |
तेंव्हा मानू
पेरत जा तू मंगल मैत्री मानव तेंव्हा मानू
मानवतेचे प्रस्थ माणसा वाढव तेंव्हा मानू
केवळ स्वप्न महासत्तेचे बघून चालत नाही
प्रज्ञा,करुणे समोर डोके वाकव तेंव्हा मानू
नकोस नुसत्या गप्पा मारू समानतेच्या मित्रा
दाखल्यातली जात खोडुनी दाखव तेंव्हा मानू
भेटत नाही म्हणून द्राक्षे आंबट झाली का रे?
कोल्ह्या थोडी शक्कल युक्ती चालव तेंव्हा मानू
शर्यत होते समानअसते रेषा, स्पर्धक तेंव्हा
ससा नि कासव यांची तुलना थांबव तेव्हा मानू
ढोंगी गाढव आणि लांडगा गोंधळ घालत असता
वनराजा तू जंगल अपुले वाचव तेंव्हा मानू
वरातीत का याच्या त्याच्या उगाच नाचत फिरतो?
तुझी मिरवणुक तू यशवंता गाजव तेंव्हा मानू
यशवंत मस्के
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments