• गझल प्रभात • (भाग ८७ )
![]() |
गझलकारा वैशाली भागवत |
दु:खांना मी कवटाळत नाही
आणा भाका जुन्या पुराण्या तो ही पाळत नाही
सुंदर मूर्तीवरती आता मी ही भाळत नाही
आठवणींची अनेक पाने वहीत भरली होती
बघून त्यांना मनास हल्ली उगाच जाळत नाही
ओंजळीत मी जपून आहे फुललेले क्षण माझे
दारी येणाऱ्या दु:खांना मी कवटाळत नाही
हर एक हिरा दडून असतो दगडामध्ये साध्या
म्हणून सगळे दगड उराशी मी सांभाळत नाही
विचारले जर रहस्य कोणी आनंदाचे माझ्या
उत्तर सोपे नसून सुद्धा सवाल टाळत नाही
सौ. वैशाली भागवत
बडोदे
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments