• गझल प्रभात • (भाग ९१ )
गझलकारा ज्योती शिंदे |
गझल होत आहे
तुझ्या आठवांची गझल होत आहे
मुक्या भावनांची गझल होत आहे
भिजूनी जरा आज गेलेत डोळे
तुझ्या आसवांची गझल होत आहे
कुठे वाट गेली मलाही कळेना
खुळ्या पावलांची गझल होत आहे
हवा पावसाळी मला त्रास देते
सुन्या वेदनांची गझल होत आहे
जिथे हरवले ते नभी चंद्र तारे
तिथे तारकांची गझल होत आहे
सौ. ज्योती प. शिंदे
रोहा - रायगड
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments