• गझल प्रभात • (भाग ८५ )
![]() |
गझलकारा दिपाली वझे |
🌹हे जिंकणेच असते मित्रा अहंपणावर🌹
रुसलाय गाव माझा सोडून मी दिल्यावर
लिहिलेय नाव माझे मुद्दाम त्या फळ्यावर..
डोक्यावरी चढवले ओझेच भावनांनी
अश्रूस गाळले मी हळुवार काळजावर..
जीवन असेच असते हरणे क्षणाक्षणाला
हे जिंकणेच असते मित्रा अहंपणावर..
आधार भावनांचा दिधला कुणी कितीही
उधळू नयेत दुःखे आली जरी जिवावर..
घेता मुळी न आले इतके दिले जगाने
झोळीस सांधली ना केली टिका जगावर..
सौ. दिपाली महेश वझे
बेंगळूरू
मो. 9714393969
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments