• गझल प्रभात • (भाग १११ )
![]() |
गझलकारा डॉ रेखा देशमुख |
द्या मूलमंत्र मजला
द्या मूलमंत्र मजला मनभाव वाचण्याचा!
आणिक जगास साऱ्या अपसूक भावण्याचा!
विश्वास पार तुटला सांधेल का कधी हा?
होतोय त्रास आता भरपूर जागण्याचा!
सारून दूर झालो मी प्रेम बीम आता
फसलाय डाव पुरता हृदयास मागण्याचा!
दिसणार ना कुठेही नैराश्य फार जर का
उच्चांक होत आहे ध्येयास गाठण्याचा!
साऱ्या जगास ठावे हे मोल शिक्षणाचे
काहीच अर्थ नाही मागास राहण्याचा!
डाॅ. रेखा देशमुख
बाणेर पुणे
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments