Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

काळजातली जखम Gazalkara Mrunal Gite

• गझल प्रभात •(भाग १०५ )
काळजातली जखम
गझलकारा मृणाल गिते 

🌹काळजातली जखम 🌹



काळजातली जखम भाजते पुन्हा पुन्हा
जखमेवरती मीठ सांडते पुन्हा पुन्हा

गंध उडाला, बहर संपला ,सर्व तरी
तू का चाफा उगा माळते पुन्हा पुन्हा

करून गेला खून मनाचा मित्र कसा
खपली तेथे डंख मारते पुन्हा पुन्हा

सुंभ जळाला, पीळ तुटेना,माज असा..
अहं स्वतःचा स्वतः सांधते पुन्हा पुन्हा

सावरून घे सख्या मला तू जगतांना
नियती सुद्धा मारत असते पुन्हा पुन्हा

फांदी तुटता दुःखी होते सुगरण ती
तुटले घरटे, तरी बांधते पुन्हा पुन्हा

हृदय जळाले दुःख झिरपले आत कसे
डोळ्यांमधली ओल जाळते पुन्हा पुन्हा

झोप मोडतो चंद्र येऊन खिडकीशी
आठवण तुझी फिरत राहते पुन्हा पुन्हा

कशास वेडे अशी कुशीवर तळमळते
भिंतीवरची खरड पाहते पुन्हा पुन्हा

मृणाल गिते
नाशिक

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments