• गझल प्रभात • (भाग ८८ )
![]() |
गझलकारा शुभांगी कुलकर्णी |
🌹मैत्री अशी सांभाळते मी🌹
तुझ्या आधी तुझ्या नंतर स्वतःवर भाळते मी
तुझ्या पश्चात प्रीतीला पुरेशी जागते मी
ऋतू कुठला जरी नाही बहरला आज दारी
मला वेचून काहीसे नव्याने माळते मी
किती पळशील तू भाग्या असा देऊन धोका
तुला खेळामधुन सुध्दा खुशीने गाळते मी
तुझ्याइतकी कुणाशीही तशी नाहीच सलगी
व्यथे माझी तुझी मैत्री अशी सांभाळते मी
कधी काळी जरी केला फुलांनी संप मोठा ...
स्वतःच्या शब्द सुमनांनी जगी गंधाळते मी
जरी पोळून निघते मी धड्यांनी जीवनाच्या
पुढे जाण्यास हे इंधन कितीदा जाळते मी
कधी वाचू नये त्याने मनाआतील खळबळ
नजर त्याला भिडवणेही अताशा टाळते मी
डाॅ. शुभांगी कुलकर्णी
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments