• गझल प्रभात • (भाग ११८ )
![]() |
गझलकार अनिकेत सागर |
🌹वाढदिवस विशेष 🌹
🌹कृष्ण आहे 🌹
ओठात नाव राधा हृदयात कृष्ण आहे
डोळ्यात वाहणाऱ्या विरहात कृष्ण आहे
प्रेमात बोलण्याची झाली सवय अताशा
मी बोलतोय त्या त्या शब्दात कृष्ण आहे
वाटे मला अचानक सारेच जग सुगंधी
प्रत्येक घेतलेल्या श्वासात कृष्ण आहे
मोहात मी कधी ना पडलो सहा ऋतूंच्या
ऋतु सातव्या अनोख्या बहरात कृष्ण आहे
कवितेत रोज माझ्या वाहे अफाट भक्ती
भक्तीरसातल्या या काव्यात कृष्ण आहे
झोपेत चेहऱ्यावर अलवार हास्य खुलते
येतोय रोज कारण स्वप्नात कृष्ण आहे
यमदूत प्राण घेउन जातो म्हणे अखेरी
मी पाहिले उभा तर साक्षात कृष्ण आहे
अनिकेत सागर
मो. 86984 65404
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments