Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

सोपे नसते मित्रा Gazalkara Sarita Gokhale

• गझल प्रभात • (भाग ११७ )

सोपे नसते मित्रा
गझलकारा सरिता गोखले 


🌹सोपे नसते मित्रा🌹


अन्यायाचे वार झेलणे सोपे नसते मित्रा

कणखर बाणा उरी ठेवणे सोपे नसते मित्रा


दोष आपुले झाकत कुठवर जाशी दारोदारी

गीतेची त्या शपथ घालणे सोपे नसते मित्रा


रोज वेगळे रुप घेउनी मृत्यू येतो दारी

हसुनी त्याचे स्वागत करणे सोपे नसते मित्रा


चेहऱ्यावरती कल्पकतेचा जरिही नकाब असला

वास्तवतेचे दर्पण बघणे सोपे नसते मित्रा


पोपटपंची अफवांवरती चर्चा होते भारी

आयुष्याचे सत्य ऐकणे सोपे नसते मित्रा


बरे वाटते हृदयामध्ये कुणीच नसते तेंव्हा

आठवणींना चाळत बसणे सोपे नसते मित्रा


जात धर्म अन् पंथ वेगळा लाख असु दे भाषा

माणुसकीचे बंध जोडणे सोपे नसते मित्रा


सरिता प्रशांत गोखले

रत्नागिरी


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•= 

Post a Comment

0 Comments