• गझल प्रभात • (भाग १२२ )
![]() |
गझलकार बबन धुमाळ |
🌹काय सांगू त्या व्यथांना🌹
काय सांगू त्या व्यथांना ज्या दिलेल्या तूच होत्या
काळजाच्या वेदनाही पाहिलेल्या तूच होत्या
वेगळा नव्हतोच केव्हा सावरायाला मला मी
पाकळ्या अन् पाकळ्या या चुंबिलेल्या तूच होत्या
का बरे वरदान द्यावे ईश्वराने एकट्याला
घातल्या माळा तयाला गुंफलेल्या तूच होत्या
सोडले वाऱ्यावरी मी तू तसे करणार नाही
जन्म देताना कळाही साहिलेल्या तूच होत्या
सोडलेला ऐनवेळी हात का माहीत नाही
दूर जाता तोच धारा वाहिलेल्या तूच होत्या
बबन धुमाळ
वाघोली, पुणे 412207
मो. 9284846393
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments