• गझल प्रभात • (भाग १२१ )
गझलकारा डॉ अमिता गोसावी
🌹किती किस्से तुझ्या रसदार ओठांचे 🌹
हजारो चाहते होते तुझ्या अलवार ओठांचे
फिरत होते किती किस्से तुझ्या रसदार ओठांचे
जराशी चूक झाल्यावर मला तू माफही केले
मुडपले तू जरी होते घडे दळदार ओठांचे
दिले उत्तर खरे होते तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे
छळावे मौन का मजला निरव हळुवार ओठांचे
स्मिताच्या महिरपींमध्ये कशाला कैद तू केले
निनावी दुःख खुपणारे तुझ्या बेजार ओठांचे
प्रसंगाला स्मितामधुनी दिला आधार तू होता
कसे मानू किती मानू सतत आभार ओठांचे
डॉ अमिता गोसावी
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments