• गझल प्रभात • (भाग १२३ )
![]() |
गझलकारा उर्मिलामाई बांदिवडेकर |
🌹वाढदिवस विशेष 🌹
🌹रेशमी रेशमी 🌹
वाजवी वागणे रेशमी रेशमी
लाघवी बोलणे रेशमी रेशमी
नेत्र कमळापरी दात मोत्यापरी
रूप हे देखणे रेशमी रेशमी
केस पाठीवरी मोकळे सोडले
भुरभुरू नाचणे रेशमी रेशमी
हास्य वाटे तिचे का जगावेगळे
सांडले चांदणे रेशमी रेशमी
गोड स्पर्शातली फार जादू तिच्या
भावना गोंदणे रेशमी रेशमी
गाल दिसतात हे तर गुलाबापरी
छानसे लाजणे रेशमी रेशमी
शब्दगंगा गझल वाहते या मनी
वेदना मांडणे रेशमी रेशमी
उर्मिला बांदिवडेकर
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments