• गझल प्रभात •
मराठी भाषा गौरव दिन विशेष
🌹मराठी खरी..🌹
मराठी खरी आपली लाज आहे!
हिच्या वैभवाचा इथे ताज आहे!!
तुकाराम ज्ञानेश्वरानेच आता;
हिला चढविलेला असा साज आहे!
हिला पाहिले मी तिथे पंढरीला;
मृदंगे अभंगात आवाज आहे!
मना सज्जनांचेच हे रामदासी;
मराठीतले हे घरंदाज आहे!
किती गोड आहे तिची ओढ आहे;
नको त्याच भाषेस का माज आहे!
नजाकत मराठीतही सिध्द झाली;
भरे भव्यजत्रा बघा आज आहे।
मराठीच आई खरी साय 'साबिर';
तुझे नाम घेण्यात का लाज आहे!
बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर सोलापुरी)
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments