• गझल प्रभात • (भाग १३९ )
![]() |
गझलकारा माधुरी बर्वे |
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌹जोडताना बंध ठेवा गोडवा🌹
स्नेहधागा जोडला आहे नवा
दूर आता ठेव सारा रूसवा
तीळ आणिक गूळ शिकवी सर्वदा
जोडताना बंध ठेवा गोडवा
शुभ्र हलवा शोभतो काट्यामुळे
शर्करेचा स्वादही तेथे हवा
साह्य करणारा कुणी असता सवे
मोल त्याचे वागताना आठवा
योग्य वर्तन पाहिजे आता खरे
ऱ्हास सृष्टीचा विचारे थांबवा
सौ माधुरी बर्वे
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments